Nanded: प्रसिद्ध माळेगाव यात्रा रद्द करण्याचा निर्णय ABP Majha
दक्षिण भारतातील सर्वात मोठी व प्रसिद्ध असणारी श्री क्षेत्र खंडोबाची माळेगाव येथील यात्रा कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्षापासून रद्द करण्यात आली होती.यंदा लॉक डाऊन नसल्यामुळे ही यात्रा होणार अशी अपेक्षा होती.परंतु ओमायक्रोनचे संकट पुढे आले. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.