Nanded Heavy Rain : नांदेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, 4 ते 5 जणांचा मृत्यू ABP MAJHA
नांदेड जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मुखेड तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. मराठवाड्यात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी तिघे नांदेडमधील आहेत. लेंडी नदीला पूर आल्याने अनेक गावे पाण्याने वेढली गेली आहेत. पुराच्या पाण्यामुळे अंत्यसंस्कार करणे कठीण झाले आहे. गावकऱ्यांना पुराच्या नदीतून दोरीच्या सहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एकमेकांचे हात धरून आणि दोरीची मदत घेऊन त्यांनी नदी ओलांडली आहे. अंत्ययात्रा घेऊन जाण्यासाठीही त्यांना जोखमीचा सामना करावा लागत आहे. दोन एनडीआरएफ पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. अजूनही अनेक जण अडकून पडलेले आहेत.