Mumbai Rains | किंग सर्कल जलमय, वाहतूक मंदावली, BMC चा Orange Alert!

मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. किंग सर्कल परिसरात रस्ते जलमय झाले आहेत. सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. किंग सर्कलमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. यामुळे मुंबईकरांना पावसाचा फटका बसला आहे. वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. किंग सर्कल ते सायन पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने गाड्या चालवताना अडचणी येत आहेत. मॅनहोल उघडे असण्याची शक्यता असल्याने लोकांना त्रास होत आहे. बीएमसीने आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. "महत्वाचं काम असेल तर घराबाहेर पडा नाहीतर घरातच रहा" अशी सूचना बीएमसीने दिली आहे. सोमवार हा कामाचा पहिला दिवस असल्याने मुंबईकरांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. पाऊस अजूनही सुरूच आहे आणि हवामान खात्याने पुढील काळातही पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola