Nanded Recue Operation| हसनाळ गावातील 5 जण वाहून गेले, तिघांचे मृतदेह सापडले
महाराष्ट्रामध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे. बहुतांश भागांमध्ये नद्यांना पूर आला असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. एबीपी माझाच्या बातम्या पाहूनच पुढील दिवसाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील हसनाळ गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या घटनेनंतर मदत कार्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आले आहे. सैन्य दलाची एक संपूर्ण तुकडी हसनाळ गावाकडे मदत कार्यासाठी रवाना झाली आहे. सैन्य दलाच्या तुकडीची दृश्ये एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. रविवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसात या गावातील पाच जण वाहून गेले. त्यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले असून, दोघांचा शोध अजूनही सुरू आहे. हसनाळ गावाच्या दिशेने जाणारी ही सैन्य दलाची तुकडी महत्त्वाची आहे.