Mumbai Rain Hindimata | मुंबईत रेड अलर्ट, हिंदमाता जलमय, वाहतूक ठप्प
हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुंबईसह उपनगरात गेल्या चोवीस तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आजही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. हिंदमाता परिसरातील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूकही थांबवण्यात आली आहे कारण ब्रिज आणि आसपासच्या परिसरात पाणी भरले आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी रात्रभर मॅनहोलमधून पाणी कमी करण्याचा प्रयत्न करत होते. पुढील चोवीस तास मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत. मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना "गरज असेल तरच बाहेर पडा" असे आवाहन करण्यात आले आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आज मुंबईजवळ असणार आहे, त्यामुळे आज तुफान पाऊस कोसळू शकतो. संध्याकाळपर्यंत हा पट्टा गुजरातच्या दिशेने सरकल्यावर पाऊस कमी होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर पंधरा ते वीस मिनिटे उशिराने वाहतूक सुरू आहे. अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कालही शाळा लवकर सोडण्यात आल्या होत्या. माटुंग्यात मुलांना पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवावे लागले होते. पालिका आणि पोलीस प्रशासन अनुचित प्रकार टाळण्यासाठी काम करत आहे. एबीपी माझा नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहे.