Heavy Rain | Nanded च्या Mukhed मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेक गावं पाण्याखाली, बचावकार्य सुरू

Continues below advertisement
नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मुखेड तालुक्यात पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. भिंगोली, म्हंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती पाहायला मिळते आहे. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. पुरात अडकलेल्यांना एनडीआरएफच्या टीमकडून बाहेर काढण्यात येत आहे. हसनाळ आणि रावणगाव येथे काही लोक अडकलेले आहेत. इडग्याळ येथे अडकलेली कार बाहेर काढण्यात यश आले आहे. भिंडेगाव, बुजुर्ग, भिंगोली, रावणगाव, हसनाळ, भासवाडी आणि महाराजवाडी ही सहा गावं पूर्णपणे पाण्याखाली आहेत. रावणगाव गावठाणामध्ये अजून जवळपास सत्तर ते ऐंशी नागरिक अडकले असण्याची शक्यता आहे. एसडीआरएफची टीम, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या सर्व यंत्रणा सकाळी सहा वाजता घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. छोट्या होड्या आणि नावेच्या सहाय्याने लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. हसनाळ गावात नऊ नागरिक अडकलेले असून, एका नागरिकाला बाहेर काढले आहे. "दीड ते दोन फूट पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. पाऊस जमाई पडला तर पुढील काही तासांमध्ये सर्व परिस्थिती आटोक्यामध्ये येऊ शकते." असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पुढील काही तासांमध्ये जवानांची तुकडी घटनास्थळी दाखल होईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola