Mumbai Rains | मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसामुळे Traffic जाम, सखल भागांत साचलं पाणी

मुंबई आणि ठाणे परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे पश्चिम उपनगर आणि ठाणे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पश्चिम दृतगती महामार्ग आणि पूर्व दृतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बोरिवलीहून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली असून, अंधेरी सबवेमध्ये पाणी भरले आहे. एका विशिष्ट पातळीनंतर हा सबवे बंद केला जातो. सायन सर्कल परिसरातही पाणी साचले आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, ज्यामुळे प्रवासासाठी अधिक वेळ लागत आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने 'गरज असेल तरच घराबाहेर पडा' असे आवाहन केले आहे. काही ठिकाणी गाड्या अडकून पडल्या आहेत किंवा बंद पडल्या आहेत. मध्य रेल्वे धीम्या गतीने सुरू आहे, तर पश्चिम रेल्वेवर अद्याप परिणाम झालेला नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola