Nanded: जमाव आणि पोलिसांच्या वादाचा फायदा घेत आरोपींचा पळ ABP Majha
नांदेडमध्ये जमाव आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादाचा फायदा घेत २ आरोपींनी पळ काढला ही अफवा आहे, असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय. काल संध्याकाळी न्यायालयानं जामीन दिलेला आरोपी शिवाजीनगर पोलिसांना हवा होता.. त्याचवेळी न्यायालय परिसरातील जमाव आणि पोलिसांमध्ये वाद झाला. ज्यात जमावानं पोलिसांच्या अंगावर जाऊन धक्काबुक्की केल्याचे व्हीडिओ व्हायरल झाले होते.