Nana Patole Vs Chandrakant Patil : शपथविधीसाठी निमंत्रण, नाना पटोले-चंद्रकांत पटालांमध्ये जुंपली
Nana Patole Vs Chandrakant Patil : शपथविधीसाठी निमंत्रण, नाना पटोले-चंद्रकांत पटालांमध्ये जुंपली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल शपथ घेतली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता महायुतीच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत.शिवसेना आमदार भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी येत्या बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगितलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार याबाबत चर्चा सुरु आहेत.
टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत एक वृत्त दिलं आहे. त्या वृत्तानुसार भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार भाजप 20 ते 22 मंत्रिपदं त्यांच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 11-12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8-10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीच्या सरकारमध्ये कोणत्या पक्षांकडे काय असणार याबाबतचं सूत्र अंतिम झालेलं नाही. गृह, महसूल, नगरविकास, जलसंचन, सामाजिक न्याय खात्यांबाबत स्पर्धा असल्याची माहिती आहे. याबाबत तीन पक्षांमध्ये वाटाघाटी होण्याची शक्यता आहे. याशिवाय येत्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वच्या सर्व मंत्रिपदांवर आमदारांना शपथ दिली जाते का ते देखील स्पष्ट झालेलं नाही.