Dr.Babasaheb Ambedakar Mahamanav Mahaparinirvan : महामानवाचे महापरिनिर्वाण, जेव्हा कोट्यावधी वंचिताचा आधार हरपला

Dr.Babasaheb Ambedakar Mahamanav Mahaparinirvan : महामानवाचे महापरिनिर्वाण, जेव्हा कोट्यावधी वंचिताचा आधार हरपला

महापरिनिर्वाण दिवस हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यामुळे दरवर्षी ६ डिसेंबरला जगातून, तसेच देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जातिव्यवस्थेतील हरिजन समाजाच्या सुधारणेसाठी भरीव काम केले. अस्पृश्यतेची प्रथा संपविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करून, भगवान गौतम बुद्धांची शिकवण तळागाळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांनी मागास समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola