Nana Patole : संजय राऊत ज्या शाळेत शिकला ती शाळा काँग्रेसने सुरु केली होती, पटोलेंचा हल्लाबोल

Continues below advertisement

Nana Patole on Sanjay Raut : अठराव्या लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) अखेर सांगता झाली आहे. देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळी काल संपल्यावर साऱ्यांची उत्सुकता असलेल्या एक्झिट पोलचे (Result 2024 Exit Poll) आकडे समोर आले आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष असल्याचं एबीपी सी वोटरच्या एक्झिट (ABP Cvoter Exit Poll) पोलमध्ये समोर आले आहे. एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीला यांच्यात अटीतटीची लढाई असल्याचं दिसत आहे. तर यावरून आता अनेक दावे-प्रतिदावे केले जात असतानाच महाविकास आघाडी मध्ये सांगलीच्या जागेवरून परत एकदा खडाजंगी रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. 

संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केलीय

सांगलीच्या जागेवरून बोलताना संजय राऊत यांनी आम्ही गोट्या  खेळायला आलेलो नसल्याचे म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. राजकारणात कुणीही गोट्या खेळायला बसले नाही. मात्र तुम्ही 100 टक्के राजकारण करत असाल, तर आम्ही 20 टक्के राजकारण आणि 80 समाजकारण करतो. संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केलीय.

तसेच संजय राऊत यांचा जन्म झाला ते रुग्णालय देखील काँग्रेसने निर्मांन केलंय, त्यांच्या गावात वीज-पाणी दवाखाने काँग्रेसच्या काळात पोहचले. संजय राऊत कालच लंडनहून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तिथल्या थंडीचा परिणाम आहे की इथल्या उन्हाचा, हे बघितले पाहिजे. मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही. अशा शब्दात प्रतिक्रिया देत  नाना पटोले (Nana Patole) यांनी  संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram