Nana Patole on Uddhav Thackeray : कोकण,नाशिक पदवीधरचे उमेदवार मागे घ्या; पटोलेंची ठाकरेंकडे मागणी

Continues below advertisement

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi)  पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे.  विधान परिषदेच्या (Vidhan Parishad)  निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये (Congress ) तीव्र संताप आहे. लोकसभेप्रमाणेच  ठाकरे गटाने  विधान परिषदेच्या चारही जागा परस्पर घोषित केल्याने  काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांनी विधानपरिषदेचे उमेदवार मागे घ्या, असा निरोप दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. 

महाविकास आघाडी असताना घोषणा करण्याच्या आधी चर्चा केली पाहिजे होती अशी काँग्रेसची भूमिका आहे.  मुंबईतून विधानपरिषदेसाठी अर्ज भरलेले शिवसेना उबाठाचे उमेदवार ठाकरेंनी कायम ठेवावेत. मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक उमेदवार ठाकरेंनी मागे घ्यावेत,असा निरोप नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.  चारही ठिकाणी चर्चा न करता उमेदवार दिल्याने काँग्रेसमधे नाराजी आहे.   उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला आणि काँग्रेस नेते संतप्त आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram