Nana Patole On Uddhav Thackeray : सांगलीत उद्या काँग्रेसची भव्य सभा, उद्धव ठाकरे मात्र जाणार नाहीत
Continues below advertisement
Nana Patole On Uddhav Thackeray : सांगलीत उद्या काँग्रेसची भव्य सभा, उद्धव ठाकरे मात्र जाणार नाहीत
सांगली जिल्ह्यातल्या कडेगावमध्ये उद्या माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे. त्यानिमित्तानं काँग्रेसनं जंगी सभेचं आयोजन केलंय. त्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. पण उद्धव ठाकरे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. ठाकरेंना निमंत्रण असलं तरी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते येणार नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय. पण सांगलीत लोकसभेतल्या बंडखोरीची सल ठाकरेंच्या मनात आजही असल्यानंच ते या सभेला जाणार नसल्याची चर्चा आहे.
Continues below advertisement