Sanjay Raut Vs Nana Patole : आम्ही गोट्या खेळायला बसलोय क म्हणणाऱ्या राऊतांना पटोलेंचा उत्तर

Continues below advertisement

Sanjay Raut Vs Nana Patole : आम्ही गोट्या खेळायला बसलोय क म्हणणाऱ्या राऊतांना पटोलेंचा उत्तर

सांगली : सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना जितका त्रास झाला, त्यापेक्षा जास्त मला त्रास झाल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. सांगलीत आज काँग्रेसकडून मेळावा आोयजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगलीमधील जागेवरून कसा काथ्याकूट झाला, तसेच जागा आपल्या पदरी पडली नाही याबाबत कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच सांगलीला मशाल पेटवावी लागेल, अशी भावना व्यक्त केली. 

आमदार विश्वजीत कदम यांनी सडेतोड भूमिका मांडत गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करूनही जागा काँग्रेसच्या वाट्याला न आल्याने पक्ष नेतृत्वासमोर जाहीर नाराजी बोलून दाखवली. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. या सर्वांसमोर विश्वजीत कदम यांनी जागा न मिळाल्याची खंत व्यक्त केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram