Nana Patole: सत्याचा विजय! Rahul Gandhi यांच्या शिक्षेला स्थगितीनंतर काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Nana Patole: सत्याचा विजय!  Rahul Gandhi यांच्या शिक्षेला स्थगितीनंतर काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया

Rahul Gandhi Disqualification Case: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काहीही होवा, त्याची पर्वा नाही, मी माझं काम करतच राहणार, आयडिया ऑफ इंडियाचे संरक्षण करत राहणार असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.  राहुल गांधी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, आज नाही तर उद्या, सत्याचा विजय होणारच होता. मला काय करायचं आहे ते मला माहिती आहे. ज्या लोकांनी मला मदत केली त्यांचे आभार आणि जनतेने भरभरून प्रेम दिलं, त्यांचंही आभार.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयात उपस्थिती लावली आणि सर्वांचे आभार मानले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा तिरस्काराच्या विरोधात प्रेमाचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीनं देण्यात आली आहे. हा लोकशाहीचा विजय असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram