Nana Patole : एकटे नवाब मलिकच का? अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यावरही आरोप होते - पटोले

Continues below advertisement

Nana Patole : एकटे नवाब मलिकच का? अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यावरही आरोप होते - पटोले

Maharashtra Assembly Winter Session 2023, Day 2: नागपुरात (Nagpur News) हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) सुरू असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik) सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. नवाब मलिकांवर आरोप करणाऱ्या भाजपला (BJP) आता मलिक कसे चालतात? असा सवाल करत सभागृहात ठिणगी पडली. आज हीच ठिणगी वणव्याचं रुप घेण्याची शक्यता आहे. सभागृहात नवाब मलिकांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. मलिकांना भाजपात सामील करुन न घेण्याची विनंती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खुलं पत्र जारी करत अजितदादांना (NCP Ajit Pawar) केली आहे. पण या ओपन लेटरवरुन सध्या अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. 

दुसरीकडे मराठा  आरक्षण (Maratha Reservation), अवकाळीमुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याचे आरोप या सर्व विषयांवर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरु शकतात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram