Nana Patole on Devendra Fadnavis : फडणवीस अभिमन्यू नाही शकुनी आहेत - नाना पटोले

Continues below advertisement

Nana Patole on Devendra Fadnavis : फडणवीस अभिमन्यू नाही शकुनी आहेत - नाना पटोले 

हेही वाचा : 

अखेर पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे  वडगाव शेरीचे विद्यमान आमदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक देखील आग्रही होते, तर मुळीक यांना भाजप श्रेष्ठींनी शब्द दिल्याचं देखील त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं, त्यानंतर आज सकाळी पत्रकार परिषदेवेळी सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली, त्यानंतर आता मुळीकांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.    जगदीश मुळीकांना श्रेष्ठींचं आश्वासन पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना वगळून आपल्याला उमेदवारी मिळेल, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिल्याचा दावा भाजपचे माजी आमदार जगदिश मुळीक यांनी काल (गुरूवारी) केला होता. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, पक्षाकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नव्हती. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सुनील टिंगरेंचे नाव देखील नव्हते. दुसरीकडे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या मतदारसंघात पेच निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या. आज सकाळीच सुनील टिंगरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram