Nana Patole on Vidhan Sabha : विधानसभा निवडणुकीत 90 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देणार : नाना पटोले

Continues below advertisement

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तरूण आणि तरुणींना सिट वाटपात ९० टक्के प्राधान्य देण्यात येणार. नविन चेहरे समोर आणले जातील

नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापुर या दोन्ही विधानसभेत कॅाग्रेसची ताकद वाढली आहे. गेल्या काही दिवसात या शहरात कॅाग्रेसचे काम चांगले झाले आहे. त्यामुळे सिट वाटप करताना याबाबत मी बैठकीत मुद्दा मांडणार आहे

माझ्या विरोधात भाजपाने आंदोलने केली असल्याने मला यांच्या पासून धोका आहे.  सरकारकडे सिक्युरिटी मागूनही मला मिळाली नाही. मात्र गुंडाना सरकार वायप्लस सिक्युरिटी देत आहे

दहीहांड्या मोठ्या प्रमाणात लागणार असल्या तरी तरूण सरकारचे पाप विसरलेले नाहीत. भ्रष्टाचाराचा पैसा दहिहंडीसाठी वापरला जातोय

ऐरोलीतील ५० हजार करोडचा भुखंड सिडको उद्योगपतीला देणार असली तरी कॅाग्रेस पक्षाने याला विरोध केला असून आर पारची लढाई कॅाग्रेस लढेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram