Nana Patole | Mohan Delkar आत्महत्या प्रकरणाचा तपास व्हावा : नाना पटोले
खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलंय. डेलकर यांनी त्यांच्या पत्रात अनेक आरोप लावलेले आहेत. त्या आरोपांची राज्य सरकार चौकशी करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एका आदिवासी खासदाराला आत्महत्या करावी लागली. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केलीय.