Chandrashekhar Bawankule | आपल्या वीज वितरण व्यवस्थेवर सायबर हल्ला शक्यच नाही : चंद्रशेखर बावनकुळे

Continues below advertisement

नागपूर : मुंबईतील वीज यंत्रणेवर 12 ऑक्टोबर रोजी चीनने सायबर हल्ला झाला होता, असा दावा ऊर्जा आणि गृह विभागाच्या एका अहवालात करण्यात आला. परंतु तरी तो धादांत खोटा असल्याचा आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. आपले अपयश लपवण्यासाठी दोन्ही मंत्र्यांनी हे खोटे अहवाल एका आयपीएस अधिकाऱ्याकडून तयार करुन घेत राज्याच्या 12 कोटी जनतेची दिशाभूल केली, असा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.

12 ऑक्टोबरच्या तीन दिवस आधीच मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या चार पैकी दोन लाईन्समध्ये बिघाड झाला होता. त्याकडे ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले नाही, म्हणून मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या उर्वरित दोन लाईनवर दबाव वाढून त्याही बंद पडल्या. जर 12 ऑक्टोबरच्या आधी तीन दिवस ऊर्जा विभागाने लक्ष घातले असते तर मुंबईत वीज पुरवठा दिवसभर बंद पडला नसता असे ही बावनकुळे म्हणाले.

महाराष्ट्राच्या वीज वितरण व्यवस्थेवर सायबर हल्ला होणं शक्यच नाही. कारण आपण अजूनही मॅन्युअली ऑपरेट करत आहोत, असं सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्व प्रकारची केंद्र सरकारने चौकशी करावी अशी मागणी केली. विद्यमान ऊर्जा मंत्र्यांना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचे विषय, वीज बिल माफीबद्दलचे मुद्दे यावर बोलायचे नाहीत म्हणून एका आयपीएस अधिकाऱ्याकडून खोटा अहवाल तयार करुन त्यांनी विधीमंडळाची दिशाभूल केल्याचे बावनकुळे म्हणाले.

दरम्यान मुंबईच्या वीज वितरण प्रणालीवर चीनने सायबर हल्ला केल्याचं समोर आल्यानंतर ऊर्जा विभागाने केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागाला का कळवलं नाही असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram