Nana Patole Name Plate : भंडाऱ्यातील घरावर विधानसभा अध्यक्षचा उल्लेख, पटोले आठवणीत रममाण?

Continues below advertisement

काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अजून ही स्वतःला विधानसभा अध्यक्ष समजतात का? असा सवाल उपस्थित होत आहे कारण नाना पटोले यांच्या निवासस्थाना बाहेर आजही त्यांच्या नावा खाली विधानसभा अध्यक्ष असा फलक आहे, 4 फेब्रुवारी 2021 रोजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा  राजीनामा सुपूर्द केला होता. त्यानंतर त्याच्यावर बरीच टीका झाली, नाना पटोले यांच्या पाठोपाठ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राजीनामा दिल्याने ठाकरे सरकारला पाय उतार व्हावे लागले. नाना यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित सरकार पडले नसते असा सूर त्यावेळी ऐकायला मिळत होता. नानांच्या राजीनामा नंतर राज्याच्या राजकारणात मोठे रामायण घडले, सत्तांतर नंतर विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर दोन ऐतिहासिक निकाल दिलेत एवढ्या मोठ्या घडामोडी घडल्यानंतर ही नाना पटोले याच्या निवासस्थानी विधानसभा अध्यक्ष असा फलक असल्याने राहुल नार्वेकर अध्यक्ष की नाना पटोले हा सवाल उपस्थित होतोय., ही नजरचुक म्हणावी तर रोज शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक नानांच्या भेटीसाठी येतात कोणाच्याच कसे लक्षात आले नाही, की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असतानाही विधानसभा अध्यक्षच्या आठवणीत रममाण होण्यात नानांना जास्त आनंद मिळतो असे असंख्य प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. भंडारा जिल्ह्यातील सुकळी या गावातील नाना पटोले यांच्या निवासस्थाना बाहेरून आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram