Nana Patole Majha Vision : शेतमालाला हमीभाव, मोफत शिक्षण, नोकरभरती, पटोलेंनी मविआचं धोरण मांडलं

Continues below advertisement

Nana Patole Majha Vision : शेतमालाला हमीभाव, मोफत शिक्षण, नोकरभरती, पटोलेंनी मविआचं धोरण मांडलं

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात उपस्थिती लावत विविध मुद्यांवर भाष्य केलं. महिला, मुलींची सुरक्षितता, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेतील बदल, नोकरभरती या मुद्यांवर नाना पटोले यांनी भाष्य केलं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यास या घटकांसाठी कोणतं काम करणार हे नाना पटोलेंनी सांगितलं. 
 
नाना पटोले म्हणाले, महिलांना सन्मान देण ही प्राथमिकता, लहान मुली शाळेत किंवा बाहेर असतील त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत, आमचं सरकार काम करेल, असं सांगितलं.

शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. अन्नदात्याला ताकद देणं, कर्जातून मुक्त करणं, शेतमालाला योग्य भाव देणं ही आमची प्राथमिकता आहे, असं पटोले यांनी स्पष्ट केलं.

आरोग्य व्यवस्था आणि शैक्षणिक व्यवस्थेमध्ये स्थिती निर्माण झालेली पाहता, या क्षेत्रातील पदं भरणार आहोत.अत्याधुनिक व्यवस्था शासकीय दवाखान्यात निर्माण करणार आहोत. काही आजारांच्या खर्चासाठी 25 ते 30 लाख रुपये लागतात ते देण्याचा निर्णय घेणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं.  शैक्षणिक व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. गरिबांची मुलं, शेतकरी, शेतमजुरांची मुलं आता शिकू शकत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण मोफत होतं, भाजपनं आणि त्यांच्या युतीनं शिक्षण विकत घेण्याचं काम केलं, असा आरोप नाना पटोले यांनी केला.आम्ही शाळेतील मुलांना मोफत दोन ड्रेस, पुस्तक देण्याचा निर्णय घेतला होता, या सरकारला दिवाळी आली तरी ते पोहोचवता आलेलं नाही. मूठभर लोकांच्या हातात शिक्षण द्यायचं चंद्रपूर पासून सुरु झालेलं आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram