MVA on Vidhan Parishad Cross Voting : काँग्रेसची मतं फुटली? मविआच्या नेत्यांकडून कारवाईचा इशारा

Continues below advertisement

MVA on Vidhan Parishad Cross Voting : काँग्रेसची मतं फुटली? मविआच्या नेत्यांकडून कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी संध्याकाळी जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने बाजी मारल्याचे दिसून आले. ठाकरे गटाने शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना रिंगणात उतरवल्याने विधानपरिषद निवडणूक (MLC Election 2024) चुरशीची झाली होती. लोकसभेतील यशामुळे मविआ आघाडी विधानपरिषद निवडणुकीत शिंदे गट आणि अजितदादा गटाच्या आमदारांची मतं फोडेल, अशी चर्चा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली आणि महायुतीने विधानपरिषद निवडणुकीत बाजी मारली. 

काँग्रेसची एकूण 8 मतं फुटली

विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच काँग्रेसची मतं फुटणार, अशी चर्चा होती. या निवडणुकीत अजित पवार गटाला दोन उमेदवार निवडून आणणे कठीण होते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची गरज होती. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यावर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी पहिल्या पसंतीची 23 मतं मिळवत विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसची 8 मतं फुटल्याची जोरदार चर्चा आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram