Nana Patole on Modi : पंतप्रधान मोदी नाही, गावातल्या मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल बोललो : नाना पटोले

Continues below advertisement

भंडारा : जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या.रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केले आहे. या संबंधिचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले म्हणाले की, "भंडारा जिल्ह्यात मोदी असं टोपणनाव असलेला एक गावगुंड आहे. त्या गुंडाबाबत बोलताना मी ते वक्तव्य केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ते नाही."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram