Nana Patole - CM Eknath Shinde:गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा कार्यक्रम करतो मी - मुख्यमंत्री

Continues below advertisement

Nana Patole - CM Eknath Shinde : गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा कार्यक्रम करतो मी - मुख्यमंत्री शिंदे 
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. आणि पहिल्याच दिवशी एका व्हायरल व्हिडीओनं राज्यात मोठी खळबळ निर्माण झाली. कारण 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यामध्ये विधिमंडळाच्या परिसरात झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत त्या दोघांमध्ये हसत खेळत संवाद होताना दिसतो. मग त्याच खेळकर मूडमध्ये नाना पटोलेंशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, कुणी मर्यादेच्या बाहेर गेलं की मी कार्यक्रम करतोच, असं एक सूचक वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनाच हा गर्भित इशारा दिल्याचं बोललं जातंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram