Namo Tourism Row: 'नमो केंद्र' उभारल्यास फोडून टाकू, राज ठाकरेंचा थेट इशारा Special Report

Continues below advertisement
राज्यात 'नमो टुरिझम सेंटर' (Namo Tourism Centre) उभारण्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत राजकीय वाद पेटला आहे. महाराजांच्या किल्ल्यांवर केंद्राचं नाव दिसल्यास 'उभं केलं की फोडून टाकणार', असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील रायगड (Raigad), शिवनेरी (Shivneri) यांसारख्या गड-किल्ल्यांवर ही पर्यटन सुविधा केंद्र उभारण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र, हा मुख्यमंत्र्यांचा चाटुगिरीचा प्रकार असल्याचा आरोप राज यांनी केला आहे. यावर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पलटवार करत, केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी राज ठाकरे टीका करत असून त्यांनी शिंदे यांच्यावर टीका करणे टाळावे, असे म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola