Loan Waiver Demand: 'सरकारला तुकोबांची सदबुद्धी मिळो', Rohit Pawar यांची कर्जमाफीसाठी देहूत उपोषण
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सरकारला धारेवर धरले आहे. 'जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जशी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती, त्याप्रमाणे सरकारला तुकोबांची सदबुद्धी मिळो आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी,' असे म्हणत रोहित पवारांनी सरकारला साकडे घातले. यासाठी त्यांनी देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिरासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. संत तुकाराम यांनी १६२९ ते १६३१ या दुष्काळाच्या काळात आपल्या सावकारीच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले होते, या ऐतिहासिक घटनेचा संदर्भ पवारांनी आपल्या मागणीसाठी दिला आहे. राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला असून, सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी या आंदोलनाद्वारे केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement