Zero Hour : शनिवार वाड्यात नमाज पठण; पतित पावन संघटना आक्रमक, स्वप्निल नाईक काय म्हणाले?

Continues below advertisement
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात (Shaniwar Wada) काही महिलांनी नमाज अदा केल्याच्या व्हिडिओमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर पतितपावन संघटनेचे (Patitpavan Sanghatana) अध्यक्ष स्वप्नील नाईक (Swapnil Naik) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून वाड्याचे शुद्धीकरण केले. 'हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वेळेस हिंदू धर्मावरच का अत्याचार आणि अन्याय होत आहेत? आम्ही किती दिवस हा अत्याचार अन्याय सहन करायचा?', असा संतप्त सवाल स्वप्नील नाईक यांनी उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची सत्यता पुरातत्व खात्याकडून तपासण्यात आली. ही शौर्याची भूमी असून, येथे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे संघटनेने म्हटले आहे. या घटनेमुळे पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, या चर्चेत काँग्रेसचे रत्नाकर महाजन आणि विचारवंत अन्वर राजन हे देखील सहभागी झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola