Nalasopara Unauthorized Buildings : नालासोपाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई

Nalasopara Unauthorized Buildings  : नालासोपाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई

नालासोपाऱ्यात आज सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई होणार आहे. काल तुलसी अपार्टमेंट वर झालेल्या कारवाईत काही रहिवाशांना भाड्याने रुम न मिळाल्यामुळे त्यांनी इमारती च्या समोरच चादरी आणि बांबूच्या साहाय्याने घर उभारलं आणि त्या घरात त्यांनी संपूर्ण रात्र काढली. 
उषा परुळेकर , उषा हाटवार, श्रद्धा भूषण परुळेकर (११), रिध्दी सागर परुळेकर (७) यांनी संपूर्ण रात्र मच्छरांच्या प्रादुर्भाव काढली , संपूर्ण अंधार आणि मच्छरांच्या त्रासाने संपूर्ण कुटुंब झोपलचं नाही. आ  पालिकेची कारवाई सुरु आज होणार असल्याने येथील रहिवाशांनी रुम खाली करण्याची मानसिकता बनवली आहे. कारवाई च्या अगोदर काही रहिवासी रुममधील सामान बाहेर काढत आहे. पालिकेच्या कारवाईत सामानाचं नुकसान तरी होवू नये म्हणून रहिवाशी प्रयत्न करताना दिसून येत आहे. काल तुलसी अपार्टमेंट वर कारवाई केली आज त्याच्या बाजूच्या साई कृपा अपार्टमेंट वर कारवाई करण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola