Winter Session Row: थकबाकी न मिळाल्याने कंत्राटदार आक्रमक, पुन्हा काम बंद करण्याचा इशारा
Continues below advertisement
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या (Nagpur Winter Session) तयारीवर पुन्हा एकदा संकटाचे ढग निर्माण झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) आश्वासन मिळूनही थकीत बिलं न मिळाल्याने कंत्राटदार संघटना आक्रमक झाली आहे. 'मागच्या हिवाळी अधिवेशनाची ९० कोटींची थकबाकी आहे, सरकार फक्त उधारीवर अधिवेशन सुरू करतंय,' असं संतप्त मत कंत्राटदार संघटनेने व्यक्त केलं आहे. गेल्या आठवड्यात काम बंद आंदोलन मागे घेतल्यानंतरही आठवडाभरात पैसे देण्याचं आश्वासन पूर्ण न झाल्याने कंत्राटदारांनी नाराजी व्यक्त केली. जर सोमवारपर्यंत प्रलंबित देयकं मिळाली नाहीत, तर पुन्हा एकदा सर्व कामांवर बहिष्कार टाकला जाईल, असा थेट इशारा नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने (Nagpur Contractors Association) राज्य सरकारला दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement