Solar Explosive Company Blast : सोलार कंपनीमध्ये भयानक स्फोट, नऊ जण दगावले, दुर्घटनेचं कारण काय?

Solar Explosive Company Blast : सोलार कंपनीमध्ये भयानक स्फोट, नऊ जण दगावले, दुर्घटनेचं कारण काय?

Nagpur News Updates: नागपूर : नागपूर (Nagpur News) अमरावती (Amravati) रोडवर बाजार गाव येथे ही कंपनीत आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, या स्फोटात मृतांचा आकडा वाढल्याची माहिती मिळत आहे. स्फोटात तब्बल नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला आहे. तसेच, या स्फोटात अनेक मजूरही गंभीररित्या जखमी झाले आहेत. 

नागपूर अमरावती रोडवरील (Nagpur Amravati Road) सोलार एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत आज सकाळी स्फोट झाल्याची माहिती आहे. तब्बल नऊ जण या स्फोटात मृत्यू झाला असून अद्यापही अनेकजण कंपनीत अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola