Solar Explosive Blast : सोलार एक्स्प्लोसिव्ह कंपनीत स्फोट, इमारतीचे भलेमोठे तुकडे 500 मीटरवर उडाले
Continues below advertisement
नागपूरमधील बाजारगावजवळच्या Solar Explosive Company मध्ये मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास स्फोट झाला. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून सतरा कामगार जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, कंपनीच्या इमारतीचे काँक्रीटचे मोठे तुकडे संरक्षण भिंतीबाहेर नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर आणि पलीकडच्या शेतात सुमारे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर येऊन पडले. एका जखमीने दिलेल्या माहितीनुसार, "रिऍक्टरमधून धूव येत असल्याचं पाहून आम्ही सगळेजण बाहेर आलो. सुमारे वीस ते पंचवीस मिनिटं सतत धूव येत होता आणि त्यानंतर स्फोट झाला. स्फोटामुळे सुमारे चाळीस ते पन्नास लोक दगडांमुळे जखमी झाले." धांडे रुग्णालयाच्या ICU प्रभारी डॉक्टर निरुपम धांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला चार जखमींना रुग्णालयात आणले होते, त्यापैकी दोघांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ICU मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. इतर जखमींना फ्रॅक्चर, डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना दुखापती झाल्या आहेत. अनेक जखमींना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
Continues below advertisement