Nagpur Rada : नागपुरात रात्री राडा, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय झालं?

Continues below advertisement

Nagpur Rada : नागपुरात रात्री राडा, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय झालं?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांचे व सर्वसामान्यांचे मूळ प्रश्न बाजूला ठेऊन वेगळाच वाद समोर येत आहे. त्यातच, उपराजधानी नागपूरमध्ये दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळतआहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुख दुखा:त सहभागी होणारे शहर आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूरच्या (Nagpur) जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तर, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनीही एबीपी माझाशी संवाद साधताना, पोलिसांच्या संपर्कात असून नागपूरकरांना शांततेचं आवाहन करत असल्याचं म्हटलंय. सध्या परिस्थिती नियंत्रणात आल्याचंही सांगण्यात येत आहे.

नागपूरमध्ये आज दुपारी काही संघटनांकडून आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागणी केली जात होती. त्यावेळीही, दोन गटात किरकोळ वाद झाला होता. नागपूरमधील दुपारचा किरकोळ वाद मिटल्यानंतर सायंकाळी 7 ते 7.30 वाजताच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकाजवळ पोहोचला आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली. दुपारी झालेल्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता, या घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram