Post Office Scam: पोस्टमास्टर महिलेकडून सव्वा कोटींचा अपहार, अटक
Continues below advertisement
नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) काटोल तालुक्यातल्या दिग्रस ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये (Digras Branch Post Office) पोस्टमास्टर सिंधुबाई बाळबुधे (Sindhubai Balbudhe) यांनी तब्बल सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. 'माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी जमा करत टाकत गेली तिथे पैसे,' अशी व्यथा एका पीडित महिलेने मांडली आहे. दिग्रससह वंडली, येरळा, धोटे, हरमखोरी या गावातील शेकडो गरीब कुटुंबांनी आपल्या कष्टाचे पैसे बचत खात्यासह RD आणि FD मध्ये गुंतवले होते. आरोपानुसार, पोस्टमास्टर पैसे जमा करून न घेता, डिपॉझिट पावतीऐवजी विड्रॉल पावतीवर सह्या घेऊन रक्कम काढत होत्या. अनेकदा पासबुकमध्ये खोट्या नोंदी करून किंवा नोंदी न करताच पैसे स्वतःकडे ठेवले जात होते. या प्रकरणी गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर काटोल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, आरोपी सिंधूबाई बाळबुधे यांना अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement