Maharashtra Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात ठाकरे गट आयोगाच्या दारात

Continues below advertisement
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) नेते अरविंद सावंत आणि अनिल देसाई आक्रमक झाले आहेत. मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात तक्रार करण्यासाठी हे दोन्ही नेते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले. काल (सोमवार) देखील हे नेते आयुक्तांना भेटण्यासाठी गेले होते, मात्र भेट न झाल्याने त्यांना कार्यालयात ताटकळत थांबावे लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या भेटीमागे, राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मतदार याद्यांमधील कथित अनियमितता हा प्रमुख मुद्दा आहे. विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमध्ये अनेक बोगस नावे असल्याचा आरोप केला असून, याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola