MP तून वाळू आणल्याचं दाखवून सरकारला शेकडो कोटींचा चुना? नागपूर पोलिसांकडून 200 कोटीचा घोटाळा उघड

Continues below advertisement

राज्यातील नद्यांमधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून सरकारचं शेकडो कोटींचं नुकसान केलं जात असल्याचा प्रकार नागपूर पोलिसांनी समोर आणलाय. वाळू तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी नागपुरातून ५ आणि भोपाळमधून एका आरोपीला अटक केलीय. गेले काही महिने सुरु असलेला हा घोटाळा तब्बल २०० कोटी रुपयांचा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. मध्य प्रदेशातून वाळू आणल्याचं दाखवून प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या नद्यांमधील वाळू अवैध प्रकारे पुरवली जातेय. त्यासाठी मध्य प्रदेशात ई ट्रांझिट पासही बनवला जातोय. नागपूर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram