Delhi Blast:दिल्ली बॉम्बस्फोटानंतर Nagpur अलर्टवर, संघ मुख्यालयाला CISF, SRPF आणि पोलिसांची सुरक्षा

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय, रेशीमबाग येथील स्मृती भवन, दीक्षा भूमी आणि प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. आमच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, 'संघ मुख्यालयाला सीआयएसएफ (CISF), एसआरपीएफ (SRPF) आणि नागपूर शहर पोलिसांचा (Nagpur City Police) असा तिहेरी सुरक्षा वेढा असून, परिसरातील प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे'. याव्यतिरिक्त, अजनी आणि इतवारी रेल्वे स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणीही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, संपूर्ण शहरात दक्षता बाळगली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola