Delhi Blast: स्फोटाआधी 3 तास Parking मध्ये होती कार, NIA कडून तपास सुरू
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी एका कारमध्ये झालेल्या स्फोटात अनेक जण मृत्युमुखी पडले असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्फोटापूर्वी ही कार तीन तासांहून अधिक काळ पार्किंगमध्ये उभी होती, असे तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG) यांच्यासह अनेक तपास यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, 'सर्व शक्यतांचा विचार करून आम्ही सखोल तपास करू आणि सर्व पर्यायांची तात्काळ चौकशी करून निष्कर्ष जनतेसमोर मांडले जातील'. या स्फोटाच्या काही तास आधी फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली होती, त्यामुळे या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का, या दिशेनेही तपास सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement