Nagpur : 75 प्रकारचे तांदूळ, भाताच्या 75 रेसिपी! प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा उपक्रम
Continues below advertisement
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर नागपुरात अनोखा विक्रम केलाय. अवघ्या साडेचार तासात ७५ प्रकारच्या तांदळापासून भाताच्या विविध ७५ रेसिपी तयार करण्याचा विक्रम मनोहर यांनी रचला. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. भारतीय खाद्यसंस्कृती श्रीमंत असून तीच जगासमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचं मनोहर यांनी सांगितलंय..तसंच यानिमित्ताने त्यांनी भारतीय शेतकऱ्यांचेही आभार मानलेत.. पाककलेशी संबंधित वेगवेगळ्या पद्धतीचे ११ विश्वविक्रम विष्णू मनोहर यांच्या नावावर आहेत.
Continues below advertisement