Nagpur : नाना पटोंलेवर कारवाईसाठी भाजप आग्रही,कोरडी पोलिस ठाण्यात भाजपचं आंदोलन : ABP Majha

Continues below advertisement

मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झालीय आणि पटोलेंवर कारवाई करावी यासाठी आग्रह धरलाय. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लावलेला नियम पोलीस नाना पटोलेंनाही लावणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजपनं नाशिक आणि नागपूरमध्ये तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. एफआयआर दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यातून बाहेर पडणार नाही असं सांगत भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram