Raj Thackeray in Nagpur : राज ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर तुफान गर्दी ABP Majha
मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात नागपुरात दाखल होणार आहेत... या दौऱ्यात ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.. तसंच पक्षाच्या विस्तारासाठी स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी नवीन शाखाध्यक्षांना नियुक्ती पत्र देखील देण्यात येणार आहेत.सायंकाळपर्यंत वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या पक्षीय बैठका होणार आहेत. दरम्यान हिवाळी अधिवेशनामुळं सर्वच राजकीय पक्षांचे नेते नागपुरात आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आता या दौऱ्यात कोणत्या राजकीय नेत्यांची भेट घेणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे....याआधी सप्टेंबर महिन्यातही राज ठाकरे यांनी नागपूर दौरा केला होता.