Nagpur :मास्क आणि सॅनिटायझरखाली साडेसात लाखांचा गांजा लपवून कारमधून तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

मास्क आणि सॅनिटायझरखाली साडेसात लाखांचा गांजा लपवून कारमधून तस्करी करणाऱ्या दोघांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे... नागपूर चंद्रपूर महामार्गावर बुटीबोरीमध्ये पवन कश्यप आणि दीपक शर्मा हे दोन आरोपी कारमधून गांजा तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.. त्याआधारे काल संध्याकाळी पोलिसांनी बुटीबोरी वाय पॉईंटवर नाकाबंदी सुरू केली. पोलिसांनी केलेल्या तपासणीत चंद्रपूरहून नागपूरकडे येणाऱ्या कारच्या सीटच्याखाली गांजा लपवल्याचं आढळलं. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 75 किलो गांजा जप्त केलाय... नववर्षाच्या स्वागतासाठी नशेखोरांच्या पार्टीसाठी गांजाची ही तस्करी केली जात असल्याचं समजतं.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola