Nagpur Farmers Protest: नागपुरारात 14 तासांपासून वाहनाांना ब्रेक, लोकांची पायपीट
Continues below advertisement
नागपूरमध्ये (Nagpur) प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी महाएल्गार आंदोलन सुरू केले आहे, ज्यामुळे अनेक राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाले आहेत. 'आम्ही कर्जमाफी होईपर्यंत हटणार नाही, मंत्र्यांनी चर्चेसाठी इथेच यावे,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपूर-हैदराबाद (NH-44), नागपूर-वर्धा, नागपूर-जबलपूर आणि नागपूर-रायपूरला जोडणारे महामार्ग रोखून धरले आहेत. या 'चक्काजाम' आंदोलनामुळे शहराला जोडणाऱ्या आऊटर रिंग रोडवर (Outer Ring Road) प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या कित्येक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या मांडल्याने नागपुरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे आणि हजारो प्रवासी, तसेच अत्यावश्यक सेवांच्या गाड्या अडकून पडल्या आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement