Drug Bust: Bangkok-Tashkent-Doha मार्गे नागपुरात 5 कोटींचे ड्रग्ज; Qatar Airways चा प्रवासी अटकेत

Continues below advertisement
नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) मोठी कारवाई करण्यात आली असून, डायरेक्टर ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंस (DRI) आणि कस्टम्सने (Customs) मिळून पाच कोटी रुपयांचे हायड्रोपॉनिक मारिजुआना (Hydroponic Marijuana) जप्त केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे, 'आरोपी प्रवाशाने ड्रग्जची ही खेप थायलंडची राजधानी बँकॉकमधून (Bangkok) घेतली होती आणि त्यानंतर उझबेकिस्तानची राजधानी तशकंद (Tashkent) येथून दोहा (Doha) आणि दोहामधून नागपूर असा प्रवास केला'. ही ड्रग्जची खेप कतार एअरवेजच्या (Qatar Airways) विमानातून आलेल्या प्रवाशाकडे सापडली. हायड्रोपॉनिक मारिजुआना हे गांजा आणि चरसपेक्षा जास्त तीव्र असून, त्याचा थेट मानवी मेंदूवर गंभीर परिणाम होतो. हे ड्रग्ज विशेषतः ईशान्य आशियाई देशांमध्ये तयार केले जाते आणि त्याचा वापर रेव्ह पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola