Pune Gang War: 'आंदेकर टोळी अजूनही सक्रिय', गणेश काळेच्या हत्येने पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान!
Continues below advertisement
पुण्यात (Pune) पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकल्याची चिन्हं दिसत असून, कोंढवा (Kondhwa) परिसरात गणेश काळे (Ganesh Kale) या रिक्षाचालकाची हत्या झाली आहे. या हत्येमागे आंदेकर (Andekar Gang) आणि कोंकण/कोमकर टोळीतील (Komkar Gang) वाद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एबीपी न्यूजचे प्रतिनिधी मंदार गोंजळे यांच्या मते, 'अंदेकर टोळीतील अनेक सदस्य अटकेत असूनही ही हत्या होत असेल, तर उर्वरित टोळी अजूनही सक्रिय आहे असं म्हणावं लागेल'. गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ होता. गेल्या वर्षी वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकर याची हत्या केली होती. आता गणेश काळेच्या हत्येमुळे, या टोळीयुद्धाला नवं वळण लागलं आहे का, याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement