Vidarbha Flood | पूर्व विदर्भात भयावह परिस्थिती, आता तातडीने मदत देण्याची गरज : देवेंद्र फडणवीस
Continues below advertisement
पूर्व विदर्भात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेशात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने आणि धरणाचे पाणी नदीत सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता पूर ओसरला असलं तरी लोकांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच लोकांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झालं आहे. पुरग्रस्थ लोक आपल्या लहान मुलाबाळांना घेऊन आपला संसार निळ्या आकाश खाली थाटत आहेत. शासन कितीही लोकांच्या मदतीला धावून आल्याची बतावणी करत असेल . मात्र दवाडीपार गावातील लोकांच्या समस्यांमुळे शासन पूरग्रस्थांप्रति किती संवेदनशील आहे, ते या लोकांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे. लोकांना राहायला घर नाही उघड्यावर हजारो कुटुंब आपला संसार थाटत असतात या निराधार लोकांवर आता राजकारण सुरु झालं आहे.
Continues below advertisement