Nagpur Congress Rift: बैठकीला Sunil Kedar यांची गैरहजेरी, केदारांनी घेतलेल्या मुलाखती अवैध घोषित

Continues below advertisement
नागपूरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार (Sunil Kedar) अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. केदार यांनी इच्छुक उमेदवारांच्या घेतलेल्या मुलाखती अवैध ठरवून, आज नव्याने मुलाखती घेण्यात आल्याने हा वाद आणखी चिघळला आहे. 'सुनील केदार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या, (मात्र) केदार यांच्या मनमानीला चाप लावत आज नव्यानं इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या आहेत.' या घडामोडींमुळे केदार गट नाराज असल्याची माहिती आहे, आणि त्यांची अनुपस्थिती हे त्याचेच द्योतक मानले जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola