DRI Gold Racket: Mumbai त सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, 11 जणांना अटक, 15 कोटींचं सोनं जप्त.
Continues below advertisement
महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) 'ऑपरेशन बुलियन ब्लेझ' अंतर्गत मुंबईत मोठी कारवाई करत सोनं तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ११ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ११.८८ किलो सोनं, ज्याची किंमत १५ कोटी रुपये आहे, आणि ८.७७ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. परदेशातून तस्करी करून आणलेले सोने गुप्त भट्ट्यांमध्ये वितळवून स्थानिक बाजारपेठेत विकले जात असल्याची माहिती डीआरआयच्या तपासात समोर आली आहे. डीआरआयने दोन अवैध वितळवणी युनिट्सवरही छापे टाकले असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा आणि तस्करीच्या नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement