Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य

Continues below advertisement

Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य

औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नागपूरमध्ये हिंसक पडसाद उमटले होते. सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये (Nagpur News) दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला. यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. नागपूरच्या महल परिसरापासून काही अंतरावर असणाऱ्या चिटणीस पार्क परिसरातही याची झळ पोहोचली. 'एबीपी माझा'ने येथील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी भयावह अनुभव सांगितला. चिटणीस पार्कमधील पेशने कुटुंबीयांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांची गाडी जाळण्यात आली. पेशने कुटुंबातील गृहिणीने सांगितले की, काल संध्याकाळी  सात-आठच्या दरम्यान हा प्रकार घडला. यावेळी अचानक जमावाने लोखंडी रॉड आणि दगडांच्या सहाय्याने आमच्या भागात हल्ला चढवला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram