Nagpur BJP Maha Jansamparka Abhiyan : महा जनसंपर्क अभियानांनंतर काय म्हणाल्या महिला?
भाजप राबवणार महा जनसंपर्क अभियान.. उद्या म्हणजेच सहा ऑक्टोबर ला नागपुरात राबवला जाईल महा जनसंपर्क अभियान... नागपूर नंतर राज्यभरात महा जनसंपर्क अभियान राबवला जाईल... या माध्यमातून एकाच वेळी शहरातील सर्व कार्यकर्ते घराबाहेर पडून घरोघरी जाऊन संपर्क साधतील. 6 तारखेला सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यान हे महाजनसंपर्क अभियान होणार... विशेष म्हणजे केंद्र, राज्य पातळीवरील वरिष्ठ मंत्रीही यात सहभागी होऊन कार्यकर्त्यांसोबत गृहसंपर्क साधतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सहभागी होणार नागपूर नंतर विधानसभा निवडणूक घोषित होण्याअगोदर तसेच नंतर प्रचारादरम्यान राज्यात इतर ठिकाणीही अशी मोहीम राबविण्यात येणार आहे.. या माध्यमातून भाजपचे कार्य जनतेपर्यंत, त्यांच्या घरापर्यंत पोहचवणार आहे... राज्यात नागपुरातून या महाजनसंपर्क मोहिमेची उद्या सुरुवात होणार असून एकाच वेळी शहरातील सर्व सहा मतदारसंघातील 2158 बूथच्या भागात भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन संपर्क साधतील.